” या वाटेवर “
कृष्ण सांगे बघ रुक्मिणी ला,
बघ ही गाथा तुझी माझी आजमितीला…
अवतरले प्रेम तुझे माझ्याच साठी,
जन्मो जन्मिच्या या ऋणानुबंध गाठी,
तुझ्याच साठी मन नजर माझी इथे झुकते,
राजश्री तू निर्मोही मन मोहिनी जाणते,
सुवर्णअप्सरा तू सूर्य किरणांत दिसली
सुवर्ण तेजाने तू सृष्टीत सजली,
सोनपावलांनी तू जीवनात आली
गजगामिनी तू मृगनयनी अवतरली,
जसे चंद्राने चांदणीस माझ्या या लपून पाहिले
चेहऱ्यावर तुझ्या हास्य गुलाबी सहज फुलले,
भावनांना माझ्या दिलीस तू हाक सोनपावली
नकळतच तू सृष्टीत माझ्या विसावली…
