Alumni Meet
काल कॉलेज मध्ये ॲल्युमिनी मिटिंग झाली,
लाकडाउन ची मात्र ती भर दुपारी जमली,
असं वाटलं बऱ्याच वर्षा नंतर सगळे भेटतील,
पण सगळेच यंत्र मानव जमले,
मित्र मात्र कायमचे दुरावले,
शाम, शशि आणि व्यंकटेश गेले,
जितेन , एड्रिएन्, ग्रिश्मा अचानक प्रकटले,
सिद्धी, अम्बरिश, अमोल इतके कसे भारावले,
आनन्द, संदीप, सुनील तर हवेतच उडाले,
जुनिअर समोर सगळ्यांनी स्वतःचेच पोवाडे गायले.
सदा, कीर्ती, शैलेश नाही,
मनिशा, अमृता, प्रीती नाही,
रघु , गजु, श्री आणि सुहास हि नाही,
ज्यांच्यात होता श्वास तो प्राणच आता नाही,
जाण्यात आता काही राम उरला नाही.
तिथे जाण्यास मीही धास्तवले,
अभिजित चे मात्र वाईटच झाले,
सारे आठवून रडूच मला कोसळले.
आपले न कुणी उरले, सारेच सुख असे कसे सरले,
टेरेस चे दरवाजे तर कधिच बंद झाले,
बाल्कनितुन गार्डन वर उडनारे पक्षी हवेतच हरवले,
वर्ग, ड्रॉईंग हॉल आणि कट्टा सारेच कसे दुरावले.
लँडलाईन वर येत होते फोन,
निघाली का? पोहोचलिस् का?
विचारणार आता कोण?
नकळत पणे झाल्या साऱ्याच आठवणी मौन,
साऱ्या च भावना ठरल्या इतक्या कशा गौण,
बर झालं मि नाही गेले आणि जाऊन पुन्हा रडले,
गेलेले कसे त्या म्रुगजळास भुलले?
गेट टुगेदर नव्हे बोर्ड मिटिंगच् होती,
सगळेच हरवलेल्याना दुरवर शोधत होती,
६० जणाची बॅच होती,
आलेली मात्र १५ हि नव्हती,
दुसऱ्याच शाखेची नको ती खोगिर भरती होती,
न् जाणारी मात्र खरच शहाणी होती.
झूम वरच् आता मिच गेट टुगेदर करणार.
कुणी ड्रॉईंग, कुणी कॉनम आम्हिच आम्हाला शिकवणार
झूम वरच् आता मि गेट टुगेदर करणार.
. – श्रद्धा, सदा, &…
16.08.2020
