हिंदवी स्वराज्य

” मराठा ” हा शब्द आणि हे नाव कुठून आलं ते आपण पुढील भागात पहणारच आहोत, उत्तरेतिल महारठ्ठी हा उल्लेख तसेच इ सा पूर्व 700 च्या दशकात भारतभर कसे पसरले गेले आणि तो उल्लेख कुठे कुठे आहे, त्याचा काय अर्थ आहे.
96 कुळ (मुख्य) म्हणजे काय आणि कोणते, ते कसे पडलेत, त्यांची पोटकुळ कोणती हे आपल्याला येणारया काही भागात कळेलच पण तत्पूर्वी आपण मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याचा पाया कसा रचला ते पाहू….
तंजावर मधिल बृहदेश्वराचा शिलालेख तसेच कृष्णाजी यांची बखर यांतुन शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांची माहिती मिळते.
” हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा “
आपण सर्वानाच हे माहित आहे की, स्वराज्य स्थापनेची, संकल्पना ही शहाजी राजेंची होती. बखरकारांच्या म्हणण्या नुसार ही संकल्पना शहाजी राजांच्या मनात आल्या नंतर पुढील पावणे दोनशे वर्षात तामीळनाडूतिल ‘ तंजावर’ ते पाकिस्तान-अफगाणीस्थान बॉर्डर वरील ‘अटक’ पर्यंत मराठ्यांचे साम्राज्य विस्तारले गेले होते.
कारण तामिळनाडूतील ‘तंजावर’ ते पाकिस्तान-अफगाणीस्थान सिमेवरिल ‘अटक ‘पर्यंत मराठ्यांना मिळत गेलेला पाठींबा आणि त्या पाठींब्या मुळे मिळत असलेला विजय……
भारतातिल प्रत्येक हिंदू राजाला मुगलांनी हरवले होते किंवा त्यांचे मांडलिक बनवले होते. हिंदू राजाचे राज्य हस्तगत केल्या नंतर त्यास दुरवर मोहीमेसाठी स्थलांतरीत केले जात होते जेणेकरून त्यांचे आस्तित्व पूर्णपणे संपुष्टात, येईल.
शिसोदे हे चितोड़ जवळील मोशी किल्ल्या जवळ भोसावत या गावचे आहेत.
चितोड चे “महाराणा लक्षमणसिंह शिसोदिया” यांच्या मृत्यू नंतर शिसोदियांचे वंशज अल्लाउद्दीन खिल्जी पासुन स्वत:ला वाचवत दौलताबादला अहमदशहा निजामशहा यास येऊन भेटले आणि येथे भोसले(भोसावत गावचे) होऊन दिड हजारी मनसबदार उमराव बबून दौलताबादच्या सुलतान कडे चाकरी करू लागले. दीड हजारी मानसबदार बनून चाकण आणि आजुबाजुची 84 खेडी मिळवली.
बखरकाराच्या म्हणण्या नुसार ” मालोजी भोसले ” हे मुळचे ” मालकर्ण सिसोदीया ” असल्याची नोंद राजदरबारात आढळुन येते. भोसले आणि शिसोदिया यांची कुलदेवी आणि कुलदैवत सुद्धा एकच असल्याचे आढळुन आले आहे. यांची मंदिर चितोड ला सुद्धा आपल्याला आढळुन येतात.’
गागाभट्ट यांनी पुढे 1674 मध्ये उत्तरेतिल राजघराण्यातिल दस्तैवज तसेंच काशी ला असलेल्या वंशावळितिल नोंदीची खात्री करूनच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता.
कृष्णाजी अनंताची बखर तर सर्वमान्यच आहे. कृष्णाजी अनंत सभासदानेही महाराज क्षत्रिय राजपूत होते असं आपल्या बखरीत नमुद केलं आहे.
एके ठिकाणी बखरकार महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यातील संभाषणाबद्दल लिहीतो,
मिर्झाराजे म्हणतात, “… हीच गोष्ट खरी. आपण राजपूत, तुम्ही (शिवाजी महाराज) व आम्ही एकजाती आहोत. अगोदर आमचे शिर जाईल मग तुम्हांस काय होणे ते होईल… “.
मिर्झाराजे हे पराक्रमी क्षत्रिय राजपुत होते पण त्यांना स्वराज्यात सहभागी होण्यासाठी तयार करण्यात शिवाजी महाराजांना अपयश आले होते.
शहाजीराजांच्या दरबारात असणाऱ्या कवी जयराम गंभीरराव पिंड्ये याने सुद्धा भोसल्यांच्या कुळाविषयी लिहून ठेवल आहे – ‘ उपनाम भोसले, वंश शिसोदे, वर्ण क्षत्रिय , (राजपूत), गोत्र कुशिक (कौशिक) ‘ असल्याचं जयराम सांगतो.
शिवाजी शहाजी राजे, विजापुर च्या आदिलशहा कडे होते पण तुळजापुरच्या भवानी माते च्या मंदिरास विजापुर दरबारतुन विकास आणि खर्चा साठी वार्षिक, मोठी रक्कम दिली जातं होती, हा उल्लेख आपल्याला तुळजापूरच्या मंदिरात आढळुन येतो……हिंदू आणि हिंदू मंदिरांची विटंबना करणाऱ्या शाह कडून मात्र या मन्दिरास सुरक्षा देण्यात आली होती.
याच ओळखी चा उपयोग करुन शहाजी राजांनी दूरदृष्टी ठेवून स्वारज्या चा पाया रचला…
शिवाजी महाराजांचे ८ लग्न का झाले, कोणाबरोबर झाले या बद्दल आपण माहीती घेऊ.
या लग्नांतून शहाजी राजांची रणनिती तसेच दुरदृष्टी आपल्याला दिसून येते.
Reference :
- केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मे पाढाये जाने वाले
” The History of India 1600 – 1947 “
लेखक – Jordon Stewart. - भीष्म पर्व.
- भारतीय संस्कृती कोश.
- मराठी पुस्तक आम्ही चित्पावन.
