हरवलंय तरी काय ?
* यश आणि पैसा या व्यतिरिक्त आपल्या जीवनात कधी कधी कसली तरी कमी जाणवते ?
* सगळी सुख आहेत पण समाधान कुठेतरी काहीतरी अपूर्ण आहे अस वाटत का ?
* ती कोणती अपूर्णता आहे ?
* नक्की काय missing आहे ?
मला तरी या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, कारण मला बहुतेक हे प्रश्न कधी क्वचितच पडले असतील पण कधी या प्रश्नांनी मला त्रास नाही दिला.. किंवा दुसऱ्या क्षणी हवेत विरलेले असतात हे प्रश्न..
पण काही मित्र असे आहेत ते या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोणत्याही वेळी अचानक मला फोन करण्यापासून स्वतःला थांबवू नाही शकतं… अर्थात मी पण बोलातोच तेव्हा … मूळ प्रश्न बाजूला राहून कुठेतरी बदल शोधण्यासाठी मग आमचा weekend प्लॅन होतो.. बहुतेक वेळा ट्रेकिंग करण्यासाठी…
उंच त्या शिकरावरून मग सभोवतालचे जग न्याहाळत तासनतास बसायच… कॉफी container मधील कॉफी संपली तरी थंड हवेतील गारवा पित त्या समोरील पिंजलेल्या ढगांना स्पर्श करायचा तर कधी दूर असतील तर न्याहाळत बसायच…
सूर्यास्त पाहून निघाल्यानंतर कुठेतरी वाटेत डिनर करताना ताजे तावाने झाल्याची अनुभूती ही अवर्णनीय असते…
पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच कॅसेट रिपीट होणार असते…पण मनात सहज विचार येतो…
जग न्याहाळताना स्वतःकडे न्याहाळत बसण का नाही अजून तरी शक्य झालं ?
धावताना दूरवर… महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरांवर जायला वेळ आहे… मित्रांसोबत घालवायला पण वेळ आहेच..पण
स्वतःला भेटायला वेळ का नाही ?..
म्हणूनच बहुतेक काय missing आहे ?
हा प्रश्न अनुत्तरित असेल अस वाटत…
जे शोधण्यासाठी सागर किनारी किंवा ढगांच्याही वर जाऊन तासनतास घालवले तिथे तर हा प्रश्नच आठवत नाही…

असो, तुम्हालाही जर हे प्रश्न पडले असतील तर उत्तर शोधण्यासाठी नक्की वेळ द्या….
22/11/2023
