स्वीकारातील अलिप्तपणा
आपल्याला अप्रिय असलेल्या घटना आपल्या समोर होत असताना काही वेळा असे क्षण येतात की काही जणांना त्या क्षणी आपला श्वास सुद्धा नकोसा होतो, असह्य होत स्वतःच ते असणं.
आपल्यात कितिही तत्व ज्ञान असलं तरी त्या क्षणी आपल्याला विसर पडतो…आपल्या ज्ञानाचा, आपल्या तत्वाचा, असं वाटत सगळं सोडून निघून जावं दूर कुठेतरी अज्ञाताच्या दिशेने, अथवा दिशाहीन होऊन शोध घ्यावा क्षितिजा चा , स्वतःचा……
कारण असत… फक्त एक निमित्त, आपल्या मानाविरुद्ध येऊन गेलेला तो एक क्षण, ती एक घटना.
आपलं मन त्या क्षणा चा स्वीकार करायला तयार नसत..
हा स्वीकार अशक्य नसतोच पण सोपही नसत त्या नको असलेल्या चा स्वीकार करणं..
अवघड आणि सोपं या संकल्पनाच मुळात आपल्या मनाने तयार केलेल्या.. नाहीतर आपल्याला अवघड वाटणार आपलं आयुष्य इतर कोणाला सोप्प वाटलच नसत कधी…
या मनःस्थिती तून बाहेर पाडण्यासाठी गेल्या कित्येक युगांपासुन आपण स्वतः वर प्रयोग करत आलेलो आहोत..
त्यातील एक सोपा प्रयोग म्हणजे, सहज पणे – अगदी सहजपणे तुमचा मनाविरुध घडत असलेल्या क्षणाचा स्वीकार करायचा… जो क्षण बदलण आपल्या हातात नाही त्याचा प्रतिकार करण म्हणजे स्वतःला आत्म क्लेश करून आणखी त्रास करून घेण्या सारखं आहे…
त्यापेक्षा त्या क्षणाला स्वीकारून स्वतःला त्रयस्थ किंवा अलिप्त करणे.. मुळात काही घटना च आपण त्यांना प्रतिकार करावा म्हणून होत असतात…विचार करून पहा – आपण जर प्रतिकार आणि परिणाम केलाच नाही तर?
तसं केलं तरच त्या घटनेचा प्रभाव कमी होणार असतो..
आणि त्या नंतर आपण निर्माण झालेल्या प्रश्नाचे शांतपणे अधिक प्रभाविपणे निराकरण करू शकतो..
अलिप्त राहून त्रयस्थपणे एखाद्या घटनेचा किंवा विचाराचा त्या क्षणी स्विकार् करणे…आणि नंतर शांतपणे त्यावर विचारपुर्वक निर्णय घेणे हे अवघड असल तरीही अशक्य नक्किच नाही…
आभासी जगाचा बहुतेक आपल्यावर एवढा परिणाम नाही होत सहसा.
पण मला वाटत आपल्या आयुष्यात किंवा दैनंदिन वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यवसायीक जीवनात असे काही प्रसंग येतात, त्या क्षणी आपल्याला काय कराव कळत नाही किंवा आपण हतबल होतो, त्या बद्दल ….त्या परिस्थिती पासून काही काळ अलिप्त व्हाव्…असं वाटत…
याला आपण क्षणभर विश्रांती असं म्हणू शकतो….
खरं तर एवढ्या समजूतदार पणा चा त्या क्षणी विसर पडलेला असतो..पण संयम… शांत राहणे आणि स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करणं काहीवेळा निर्णायक ठरत…
