स्पोर्ट्स बाइक राइडर आणि मी
कॉलेज वरून घरी परत येत असताना….
पुन्हा..
?
मी खूप आनंदात होतो, पहिला च् पेपर छान गेला होता आणि त्याच विचारात मी छान हळुवारपणे बाइक चलवण्याचा आनंद घेत माझी होंडा चालवत होतो, मला आठवत… वेग त्यावेळी 35 असेल. घरी जातं असताना अचानक लक्षात आलं कि विवेक इथेच राहत होता, पण त्या वेळी त्या बाल्कनी मध्ये दुसरं च कोणीतरी होत.., क्षणभरात मी पुन्हा समोर पाहून सावकाशपणे जात होतो आणि क्रॉसिंग वर मी वेग आणखी कमी केला.
अचानक वेगात मागून एक स्पोर्ट्स बाईक रायडर मला हुलकावणी देऊन तो निघुनही गेला, पण त्याला धक्का लागू नये म्हणून मी वेग आणखी कमी केला आणि वाऱ्या च्या वेगाने उजवीकडुन एक स्कुटर येऊन माझ्या बाईक वर आदळली, ती धडक एवढ्या जोरात होती कि जोरात काहीतरी फुटल्या चा आवाज झाला, मी पडलो , समोरचे दोन्ही हात रोडवर आणि ब्रेक माझ्या गळ्याशी…आणखी 1 इन्च अंतर कमी असत तर तो माझ्या गळ्या च ओपेरेशन करून आत गेला असता आणि मि वर ढगात…
आणि हे सगळं घडलं…*** पोलीस स्टेशनं समोर..
बाहेर उभे असलेले, तसेंच चहा घेत असलेले सगळे पोलीस धावत आले. आम्हाला उचलल्…म्हणजे उठवलं, कपडे झटकले….पुढे काय…आमच्या दोघांच्या गाड्या आणि आम्हाला पोलीस स्टेशनं मध्ये नेलं.
मला विचारलं, ” कसा झाला ऍक्सीडेन्ट, बाइक एवढ्या वेगात चालवतात का?”
मी, “वेगात असतो तर निघून गेलो असतो स्कुटर चा मला धक्का पण लागला नसता..”
पोलीस,”म्हणजे याची चुक आहे का?”
स्कुटर चालक, “साहेब तुम्ही तर पाहत च होता, आमची काही चुक नाही, स्पोर्ट्स बाईक वाला वेगात गेला म्हणून आमचा ऍक्सीडेन्ट झाला,”
मी मनात म्हटलं, तु वेगात होता ते सांगितलं तर हे मला पण थांबवून ठेवतील.
पोलीस,”कोणाला काही लागलं का, नसेल लागलं आणि काही तक्रार नसेल तर तुमची माहिती लिहून द्या इथे आणि जा.”
स्कुटर चालक,”थोडंसं खरचटल् आहे पण ज्याची चुक होती तो तर पळून गेला आणि मला काही तक्रार नाही करायची, तस पाहिलं तर माझं स्कुटर च समोरचा भाग पूर्ण डैमेज झाला आहे पण काही हरकत नाही, मी करून घेईल रिपेअर”
पोलीस माझ्याकडे पाहून,” हे सांगताय ते बरोबर आहे का, त्या बाईक वाल्यामुळे झाला का ऍक्सीडेन्ट ?, तुझ्या बाइक चा सायलेन्सर पूर्ण आत गेलं आहे, टाकी एका बाजूने घासली गेली आहे.”
मी, ” जाऊ द्या साहेब, माझं मी करून घेईल रिपेअर, माझी काही तक्रार नाही.”
मला एकच भीती होती कि वडीलांच्या ओळखी च कोणी मला पाहू नये आणि त्यांना काही सांगू नये… कारण मी बाइक वेगात चालवतो हि अफवा त्यांच्या डिपार्टमेंट च्या लोकांनी च पसरवली होती आणि मला विनाकरण प्रसिद्ध करून ठेवलं होत..
पोलिसांनी स्कुटर चालक च लायसन्स पाहिलं आणि पत्ता लिहून त्याला जाऊ दिलं.. आणि मी घाबरलो, कारण माझ्याकडे लायसन्स नव्हतं. आता त्या माहिती लिहून घेणाऱ्या इन्स्पेक्टर समोर मी होतो, मी माझं नाव आणि पत्त्ता शॉर्टकट्स मध्ये सांगितला तो लिहुन घेतल्या नन्तर मला त्याने लायसन्स दाखवायला सांगितलं. 
मी मनात, “(देवा आता तूच काहीतरी कर)”
मी, “साहेब नवीनच लायसन्स काढलं आहे, हरवेल म्हणून घरी ठेवलं आहे, आणू का ? “
इन्स्पेक्टर, ” काय तुम्ही मुलं, एवढी अक्कल नाही का, लायसन्स सोबत ठेवायला पाहिजे, काय करतो ? कुठे गेला होता ? ”
मी, “उद्या पेपर आहे माझा.” माझं कॉलेज च आय कार्ड दाखवलं.
दुसरा पोलीस,”काय करायच मग आता , लायसन्स नाही आणि ऍक्सीडेन्ट करत फिरतो ?”
जीन्सच्या मागील खिशात हात घालत,
मी, “हि झेरोक्स नाही का चालणार ?, माझा अभ्यास नाही झाला, असं वाटत मी फेल होईल आत्ता, एक तर माझी काही चुक नाही यात, चुक करणारा तुमच्या समोर पळून गेला.”
इन्स्पेक्टर, ” ठीक आहे ठीक आहे, जा तु आम्ही टाकतो त्याला आत.”
(नशीब त्या इन्स्पेक्टर ने मला ओरिजनल लायसन्स आणून दाखव असं नाही म्हटलं, नाहीतर घरी जाऊन मला ते घेऊन यावं लागलं असत, पण तशी वेळ नाही आली, त्या नंतर मी नेहमी लायसन्स माझ्या जवळच ठेवतो.)
अशा प्रकारे मी तिथून बाहेर आलो, आणि हळू हळू बाइक चालवत सरळ सर्व्हिस सेंटर ला नेली.
मेकनिक , ” नवीनच बाइक आहे , सांभाळून चालवायची “
मी मनात, “देवाने माझ्या आयुष्यात सगळे मला अक्कल शिकवणारे च का पाठवलेत आणि तेव्हा, जेव्हा माझी काही चुक नसते. पण अशी परिस्थिती तरी तो का निर्माण करतो कि कोणीही काहीही माहित नसताना मला काहीही बोलेल.”
मी मेकनिक ला, ” दादा, काहीही करा पण बाइक आधी होती तशी करून द्या ”
मेकनिक, ” आता लगेंच तर नाही होणार, उद्या संध्याकाळ पर्यंत होईल आणि 1500 रुपये खर्च येईल “
मी, ” एवढा खर्च
, फक्त इन्डिकेटर तर फुटलं आहे आणि हेडलैट च कव्हर..”
मेकनिक, ” ते 500 पर्यत येईल, वाकलेल् हॅण्डल आणि आत गेलेलं सयलेन्सर सरळ करयचे 500 आणि आमचे 500., काय करयच ?”
मी,” रिपेअर तर करावच लागेल. उद्या केव्हा येऊ ? मला दुपारी 12 पर्यंत पाहिजे. (त्याने लवकर रिपेअर कराव म्हणून तस सांगितल )
मेकनिक,” 4 पर्यंत होईल.”
मी, ” ठीक आहे, 4 ला येतो. “
ऑटोरिक्षा ने मी घरी गेलो…..
काय सांगू या विचारात पण सांगावं तर लागणारच होतं….
आई ने बाईक बद्दल विचारल्या नंतर मी सांगितलं ऍक्सीडेन्ट झाल्या च आणि समोरिल भाग थोडासा डमेज झाल्याने गॅरेज मध्ये आहे, उद्या मिळेल. मला काही लागलं नाही हे पाहून आई चा जिवात जीव आला पण लगेंच उपदेश चालू झाले, अर्थात तिची काळजी दिसत होती.
खरी कसोटी तर बाबा घरी आल्या नंतर होणार होती, खर्च जर, 300, 400 असता तर एवढं डमेज झालं किंवा ऍक्सीडेन्ट झाला हे सांगावं लागलं नसत कारण मला फक्त तळ हाताला खरचटल होत…तस असत तर बाईक सर्विसिग ला टाकली आहे असं सांगितलं असत, असा माझ्या मनात विचार् आला होता. पण आता अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परीक्षे च्या पेपर पेक्षा हा पेपर जास्त कठीण होता.
रात्री घरी बाइक दिसली नाही, तेव्हा मला काही सांगावं नाही लागलं…फक्त मला ऐकावं लागलं…
( तुम्ही समजून जा..रामायण….काय काय ऐकाव लागलं असेल मला तेव्हा ते ) आणि ते सुद्धा माझी काही चुक नसताना…, “त्याची चुक होती, तर त्याला का जाऊ दिलं ? कारण तुझी च् चुक असेल.”
दुसऱ्या दिवशी आई ने पैसे दिले आणि मी गॅरेज च बिल दिलं.
क्रमश :
