सुखी भव
मला वाटतं सुख हे भौतिक गोष्टीवर किंवा समाजातील तुमच्या स्थाना वर किंवा डोळ्यांनी दिसणाऱ्या इतर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नक्की च नाही…
सुख हे आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतं अस मला वाटतं…
आपण आपल्या आनंदाचं रिमोट कंट्रोल दुसऱ्या च्या हातात द्यायलाच नको….
आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, का इतर कोणा वर आपल्या भावना अवलंबून असाव्या…मी तर म्हणेल जे लोक किंवा कारणं आपल्याला विनाकारण दुखावतात त्यांना delete च करुन टाकावं आयुष्यातून, मग पहा आनंदाचा वेल आयुष्यात कसा वर वर जातो….
इतर कोणी आपल्याला काही दिलं नाही म्हणून का दुःखी व्हावं, नाही wish केलं, नाही आपल्याला महत्त्व दिलं.. तर काय बिघडलं…
आपल्याला कोणी काही देत नाही तर अशा लोकांचा आपण विचार करून का विनाकारण त्यांना महत्त्वपूर्ण स्थान देत आहोत… याचा आपणच विचार करायला हवा. शेवटी आपल्या मनाचा आनंद महत्त्वाचा, अर्थात त्यातही सात्विकता असावी.
द्यायचं च असेल तर आपण स्वतःहून शुभेच्छा द्या,
स्वतःहून 2 गोड शब्द बोलण्यासाठी पुढाकार घ्या,
आनंद द्या, सुख द्या, मदतीचा हात द्या…
ते सगळं काही आवर्जून द्या जे दिल्याने द्विगुणित होत….
अहो एकदा देऊन तर पहा, मग अनुभवा… देण्यात जो आनंद आणि सुख आहे ते घेण्यात नाही…
आता दुसर उदाहरण पाहू
आपण आपल्या मनात बदलणाऱ्या भावना आणि आपल्याला होणारा आनंद किंवा दुःख :
म्हणजे हे पहा, तुम्हाला तुमच्या मुला ने घड्याळ दिलं त्याच्या पगारातून विकत घेऊन आणि तुम्हाला सांगितलं की ते स्विस वॉच आहे, तर तुम्हाला खूप आनंद होईल, तुमच्या मनात मुला बद्दल, घड्याळ बद्दल छान भावना निर्माण होतील..
पण
जर तुला दुसऱ्या दिवशी तुम्हाला समजल की ते ऑनलाईन मागवलेले duplicate आहे, 30 हजार च सांगितलं होत, पण 3,000/- च आहे… तर तुम्हाला दुःख होईल…
कारण तुझ्या मनातील भावना बदललेल्या असतील, त्या वेळी घड्याळ चा आनंद नाहीसा होईल आणि मुलगा खोटं बोलला, ही भावना निर्माण होईल… जे घड्याळ तूम्ही फोटो काढून स्टेटस ठेवलं, ज्याला पाहून तुम्हाला आनंद होत होता, आता त्याला पाहिलं तर तुमच्या मनात दुसरे च विचार येतील…आणि आता तो पूर्वीसारखा आनंद सुद्धा हरवलेला असेल.
म्हणजे भावना बदलल्या मनातल्या…
खर तर घड्याळ तेच आणि मुलगा सुद्धा तोच… पण भावना मात्र तुम्हाला दुःखी करून गेल्या….
….मला वाटतं …..
सुख हे समाधान वर अवलंबून आहे आणि ….
समाधान हे आपल्या मनाच्या अवस्थेवर
मनाची अवस्था त्यात निर्माण होणाऱ्या भावनांवर…..
म्हणून, नेहमी प्रत्येकाने आनंदी राहावं, मनात चांगल्या भावना निर्माण कराव्या म्हणजे सगळं काही छान दिसेल आणि आपण समाधानी होऊन खऱ्या अर्थाने सुख लाभेल…
