” सत्कर्म आणि आनंदाचं झाड “
इतरांच्या नजरेत आदर असो अथवा नसो…..
पण..स्वतः च्या नजरेत असलेला आदर टिकवता आला पाहिजे….
जिथे गुलामगिरी सारखी लाचारी आहे आणि फक्त स्वार्थ साधण्याची वृत्ती आहे तिथे तर सेल्फ respect चुकूनही फिरकत नाही, दिसला च तर तो क्षणिक असतो…
घेण्या ऐवजी द्यायला जे लोक प्राधान्य देतात… अर्थात दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य जे फुलवतात….तिथेच हा अंतर्बाह्य आदर आणि आनंद अनुभवायला मिळतो….ते तेज चेहऱ्यावर दिसून येत…..
तिथेच सेल्फ respect आहे, जिथे आपल्या हातून काहीतरी सत्कार्य घडत, कुणाला तरी मदत केल्याचा आनंद आपल्याला मिळतो… हा स्व-आदर येताना शांत झोप, आनंद, यांचं बीज सोबत घेऊन येतो आणि…… पाहता पाहता तुमचं आनंदाचं झाड करून टाकतो……।
सत्कार्य करणे, इतरांना मदत करणे या गोष्टी नकळतपणे आपल्या मनावर , संस्कार करत असतात आणि आपल्या मुळे कोणाला तरी मदत होत आहे, योग्य दिशा मिळत आहे.. हे समाधानच खूप मोठं असतं….
ज्यांनी कधी सत्कार्य केलेच नाही त्यांना त्यातील गोडवा कसा कळणार… अर्थात ते गुण मूलतः त्या व्यक्ती मध्ये असावे लागतात तेव्हाच त्या व्यक्ती कडून सत्कार्य घडत जातं… आणि नकळतपणे स्वतः त्याची ओळख सुद्धा निर्माण होत जाते….
आजकाल बहुतांश लोक स्वार्थी झाले आहेत, इतरांकडून आपल्याला काय फायदा होऊ शकतो, एवढच त्यांच्या डोक्यात येत असत आणि तेच त्यांचं ध्येय त्यांना भौतिक सुखवस्तु च्या मागे नेत..
त्या धावपळीत त्यांच्यातील निस्वार्थी वृत्ती ही हळू हळू नष्ट होत जाते… आणि बहुतेक हे लोक फक्त दिखावा करू शकतात पण खऱ्या अर्थाने त्यांच्या कडून समाजोपयोगी कार्य होत नाही…
खर तर सत्कार्य आणि सहकार्य केल्याचा आपल्या कामावर कोणताही परिणाम होत नाही… तर आपला नकळतपणे विकासच होत असतो…
आज काहीतरी सत्कार्य घडले आहे ही भावना घेऊन एका वेगळ्याच अनुभुती मधून गेल्याचा अनुभव त्यांना मिळेल…
प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपण समाजाचं काही देणं लागत आहोत हे जर लक्षात घेतलं तर या समाजव्यवस्थेचा एक भाग म्हणून त्यांनी हळू हळू सत्कार्य करण्यातील अनुभव घ्यावा अस मला वाटतं… कालांतराने त्यांना स्वतःमधील सकारात्मक बदलच त्यातून दिसून येईल…
खरंच आपण स्पर्धा न करता स्वतः कडे आणि इतरांकडे पाहिलं तर आपण आपल्यातील सर्वोत्तम देऊ शकतो… जिथे स्पर्धा संपते तिथे देण्याची भावना निर्माण होते आणि तिथूनच खऱ्या अर्थाने समाधान आणि आनंदाचं द्वार उघडलं जात…
” कौन कहता है कि आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारों…! “
