शिवरायांची लग्न आणि स्वराज्य विस्तार
शिवाजी महाराजांचे ८ लग्न का झाले ? कोणाबरोबर झाले ?
या लग्नांतून शहाजी राजांची रणनिती जसेच दुरदृष्टी आपल्याला दिसून येते.
या बद्दल आज आपण माहीती घेऊ.
“हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा”
आपण सर्वांनाच हे माहित आहे की, स्वराज्य स्थापनेची, संकल्पना ही शहाजी राजेंची होती. बखरकारांच्या म्हणण्या नुसार ही संकल्पना शहाजी राजांच्या मनात आल्या नंतर पुढील पावणे दोनशे वार्षात तामीळनाडूतिल ‘ तंजावर’ ते पाकिस्थान-अफगाणीस्थान बौर्डर वरिल ‘अटक’ पर्यंत मराठ्यांचे साम्राज्य विस्तारले गेले.
कारण ‘ तंजावर ‘ ते ‘अटक ‘ पर्यंत मराठ्यांना मिळालेला पाठींबा आणि त्यामुळे मिळत गेलेला विजय……
१) सईबाई – विवाह वर्ष – १६४०.
सईबाई च्या तंजावर च्या पवार कुळातिल माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या सुपुत्री होत्या.
माधोजीराव हे सातारयातिल फलटण येथे स्थायिक झाले होते. तंजावर येथे निंबाळकर घराण्यातिल / पवार कुळातिल काही कुटुंब आजही आहेत.
स्वराज्य विस्तारानंतर ‘सर्फोजीराजे भोसले’ हे तामिळनाडूतील तंजावर या संस्थान चे महाराज झाले. (1798-1832).
शहाजीराजे आदिलशाहीत असल्याने त्यांना उखडपणे जिजाबाई किंवा शिवाजी महाराज यांच्या बरोबर संबंध दाखवता येत नव्हते.
शहाजीराजांच्या सांगण्यावरून ११ वार्षाच्या शिवाजी राजेंचे लग्न 8 वर्षांच्या सईबाई बरोबर जिजाबाईंनी लावले आणि स्वराज्य विस्ताराचे पहिले पाऊल उचलले गेले. जिजाबाईच्या आई देखील निंबाळकर घराण्यातिल होती.
सईबाईची अपत्ये – :
1) सखुबाई.
2) राणुबाई.
3) अंबिकाबाई.
4) संभाजी (छत्रपति संभाजी महाराज)
२) सगुणाबाई – विवाह वर्ष – १६४१.
सुर्यवंशी क्षत्रिय शिर्के घराणे हे अयोध्या आणि हस्तीनापुर प्रदेशाच्या मधील असल्याची नोंद आहे. चालुक्य राजाशी शिर्के घराण्याचे जवळचे संबंध असल्याची नोंद बखरी मध्ये आहे.
विस्थापित झाल्या नंतर शिर्के घराणे दक्षीण कोकण भागात आले आणी आपल्या पराक्रमाने दक्षिण कोकण ते सावंतवाडी पर्यंतच्या प्रदेशावर यांचा अंमल होता.
सगुणाबाई शिर्के यांच्या शी विवाह करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारास गती दिली.
कोकणातिल दाभोळ येथे राजे शिर्के घराणे आहे. शिर्के घराण्याचे वर्चस्व आणी स्वराज्याप्रति निष्ठा पाहून जिजाबाईनी सगुणाबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांशी 1941 मध्येच लावून दिला.
सगुणाबाई अपत्य : –
१) राजकुंवरबाई.
३) सोयराबाई – विवाह वर्ष – १६५०
कराड जवळील तळबीडच्या संभाजीराव मोहिते यांची मुलगी.. मोहीते हे मुळचे राजस्थान चे.
पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवा नंतर त्यांच्या वंशजांना गुजराथ मध्ये राजपुताना प्रांतात पाठवण्यात आले. अर्थातच चौहान हे पराक्रमी असल्याने प्रत्येक मोहीम ते फत्ते करायचे म्हणून बादशाह कडून त्यांना ‘मुहते’ हा किताब मिळाल्याची नोंद बखररित केल्याची दिसून येते.
तसेच मुघल दरबारातिल नोंदवही मध्ये आढळते, जी अजुनही औरंगजेबाच्या कबरीजवळील संग्रहालयात आहे. पुढे मुहते चा अपभ्रंश होउन मोहिते झाले आणि दक्षीणेत मोघल साम्राज्य विस्तार करण्यासाठी ते आले.
मोहिते हे पुढे निजामशाहीत गेले, शहाजी राजांच्या प्रयत्नांमुळे आणी याच ओळखीचा उपयोग करून शहाजी राजांनी दूरदृष्टी ठेवून चौहान। मोहीते कुळातिल सोयराबाईना सुन बनवून उत्तरेत स्वराज्याचा पाया रचला तसेच मालोजी राजांच्या पत्नी दिपाबाई या सुद्धा निंबाळकर घराण्यातिल होत्या
मोहीत्यांसारखे खंबिर नेतृत्व स्वराज्यास मिळाले. पुढे मोहित्यांची मुलगी ताराबाई हिचा विवाह राजाराम राजे यांच्या बरोबर झाला. आजही मोहीते तसेच चौहान कुळातिल नाते संबंध हे राजस्थान मधे आढळून येतात तसेच भोसले घराण्यातिल विवाह राजस्थान च्या राजघराण्यात तसेच चौहान घराण्यात झालेले आढळून येतात.
पुढे भोसले हे सुद्धा शिसोदिया या कुळातिल क्षत्रीय असल्याचे सिदध झाल्या नंतर त्यांचा राज्याभिषेक गागाभट्ट यांच्या कडुन करण्यात आला.
सोयराबाईंचे अपत्य :-
1) दिपाबाई.
2) राजाराम.
४) पुतळाबाई – विवाह वर्ष – १६५३.
पुतळाबाई या कोकणातिल खालापूर येथील पालकर घराण्यातिल असून मुळ गाव रायगड जिल्ह्यातिल चौक असल्याची नोंद काही बखरिंमध्ये आहे. बळवंतराव पालकर हे शहाजी राजांच्या अत्यंत विश्वासातिल कोकणात दबदबा असणारे सरदार होते.
अदिलशहा पासून स्वराज्य सिमा रक्षणासाठी बाजीप्रभू पालकर यांची कन्या पुजनाबाई हिच्याशी शिवाजी महाराजांचा विवाह शहाजी राजांनी करवून दिला.
बखरकारांच्या म्हणण्या नुसार पुतळाबाई या जीजाबाईंच्या प्रतिबिंब होत्या, स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते.
संभाजी राजांवर त्यांचे विशेष प्रेम होते. संभाजी राजांवरील संस्कार, ग्रंथ तसेच शस्त्राभ्यासाकडे पुतळाबाईचे लक्ष तसेच मार्गदर्शन असे.
५) लक्ष्मीबाई विचारे – विवाह वर्ष – १६५६.
जावळीचे मोरे घराणे हे विजापूरचे जहागीरदार होते. त्यांचा पराभव करून जावळी संस्थानात असलेले 18 महल, 60 घाट तसेच 15 च्या वर किल्ले शिवाजी महाराजांनी काबिज केले.
तसेच स्वराज्यास हा विस्तीर्ण मुलुख समिल केल्या नंतर मोरे कुळातिल उपकुळ-विचारवंत’ म्हणजेच ‘विचारे’ कुटुंबातिल जयश्रीबाई या हणमंतराव यांच्या मुलीशी विवाह केला आणि लग्नानंतरचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवले.
हा विवाह मोहिमेवर असतांना झाला होता असे काही बखरकारांचे म्हणणे आहे.
हणमंतराव हे मोरे हे दिवाण होते जे विचारवंत / विचारे या नावाने ओळखले जात असल्याची नोंद इतिहासात आहे.
जावळी हस्तगत करण्यासाठी शिवाजी महाराजानी हणमंतरावांच्या मुलीस महाराणी बनवल्याची नोंद इतिहासात आढळून येते.
६) सकवारबाई – विवाह वर्ष – १६५७.
सकवारबाई या शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कृष्णाजी यांच्या भगीनी.
जिनाबाईंनी हे लग्न लावून दिले पुण्याजवळ हवेली तालुक्यातिल सकवारबाईचे माहेर होते.
सकवारबाई अपत्य – कमळजाबाई.
7) काशीबाई – विवाह वर्ष – १६५७.
1657 मध्ये काशिबाई चे वडील संताजी जाधव, हे कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजीराजे यांच्या बरोबर होते आणि त्यात ते मारले गेले होते.
तसेच काशी बाईचे भाऊ अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. वडिल संताजी जाधव हे कनकगीरी च्या युद्धात मारले गेल्या नंतर जिजाबाईंनी काशीबाईचा विवाह शिवाजी महाराजांबरोबर लावून दिला.
8) गुणवंतीबाई – विवाह वर्ष – १६५७
गुणवंताबाई ही चिखली चे शिवाजीराव इंगळे देशमुख यांची मुलगी. गुणवंताबाईंचे बंधू काथाजी है अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांच्या दहा अंगरक्षकांपैकी एक होते. जिजाबाईंच्या माहेरकडील या घराण्यात गुणवंतीबाई – शिवाजी महाराज विवाह करवून जिजाबाईनी पुढे नागपूर पर्यंत स्वराज्य विस्ताराची महूर्तमेढ रोवली.
या ८ घराण्यांनी शिवाजी महाराजांना, त्यांच्या नंतर संभाजी महाराजांना, ताराराणी आणि पुढे शाहु महाराज यांना शेवटपर्यन्त स्वारज्य विस्तारासाठी साथ दिली….🚩
Reference :
- केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मे पाढाये जाने वाले
” The History of India 1600 – 1947 “
लेखक – Jordon Stewart. - भीष्म पर्व.
- भारतीय संस्कृती कोश.
- मराठी पुस्तक आम्ही चित्पावन.
