वेग अपघात आणि परिणाम
अपघाता च्या मालिकेत अचानकपणे आलेला हा भाग, यात अपघात वर्णन नसून “अपघात, वेग आणि त्याचे परिणाम” यावर मी माझं मनोगत मांडलेले आहे.
असो,माझ्या अनेक अपघातांच्या मालिकेतिल दुसरा अपघात पुढील भगात नक्की वाचायला मिळेल
अपघात होणे बहुतेक विधिलिखित च असेल असं कधी कधी वाटून जातं, कारण बऱ्याच वेळा त्यात कोणाची चुक असतेच असं दिसून येत नाही.
विचार करतो तेव्हा असं जाणवत कि माझे सगळे अपघात हे गाडी चा वेग कमी असताना च् झालेले आहेत…( वेग 50 च्या आत होता ) विनाकारण मला ऐकावं लागतं कि गाडी हळू चालवत जा.. खरं तर जेव्हा जेव्हा वेग हा जास्त होता, त्यावेळी माझा कडून गाडी चा कुणाला धक्का हि लागला नाही.. पण केव्हा काय होईल हे सांगता येत नाही, याचा मला चांगल्याच प्रकारे अनुभव आलेला आहे तो सुद्धा बऱ्याच वेळा म्हणून मी वेग मर्यादेतच ठेवतो… गाडी नवीन घेतलेली असताना ती किती वेगात चालू शकते हे पाहण्याचा विचार सोडला तर इतर वेळी मात्र, त्या प्रवसाचा आनंद घेत चालण मला जास्त आवडत आलेलं आहे.
जेव्हा बाईक नवीन घेतली तेव्हा तिचा अधिकतम वेग 115 पर्यंत गेला, नंतर तो वाढत च नव्हता… कार घेतली तेव्हा तिचा वेग तर नकळतपणे वाढतच गेला आणि अचानक लक्षात आलं कि वेग त्या वेळी 155 झालाय… ते पाहूनच ए.सी. मध्ये मला घाम आल्या सारखं वाटलं… स्पिडो-मिटर वरील पाय काढून हळू हळू वेग कमी करत गाडी बाजूला थांबवली आणि क्षणभर विचार केला कि त्यावेळी अचानक कोणी मध्ये आलं असत किंवा एवढ्या वेगात आपला कंट्रोल गेला असता तर…?
…देवाचे आभार मानले कि वेळीच त्याने मला भानावर आणलं आणि काहीतरी अघटित होण्या पासून वाचवल…
अर्थात हे प्रयोग हायवे वर वर्दळ नसताना केलेल्या प्रवसात केले होते.
असो, आता मात्र जेव्हा आवश्यकता असेल तेव्हांच माझ्या कडुन वेग वाढतो, मी शार्प ड्रायविंग करतही असेल पण तरीही वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवं कि आपला किंवा दुसऱ्या चा जीव महत्वाचा आहेच पण त्या पेक्षाही महत्वाच ऍक्सीडेन्ट मध्ये जर काही झालं तर त्याचे परिणाम त्या व्यक्ती च्या कुटुंबीयांना पण होणारे असतात.
तुमच्या गाडीत असतिलही एअर बॅग, तुम्हाला कदचित काही होणारही नाही, पण गाडी समोर येणाऱ्या व्यक्ती च आणि त्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबीयांच जीवन हे सुद्धा तेवढच अनमोल आहे.
जीव गेला किंवा अपंगत्व आलं तर कुटुंबीयांना सुद्धा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि ती हानी कधिही भरून न निघणारी असतें.
क्रमशः
