विचार प्रलय
अशांत या महासागरी
जावू कसा मी पैलतिरी,
विचारांच्या या लाटांमध्ये,
पोहू कसा मी संथ किनारी.
डोक्यामधील वादळासमोर,
राहू कसा मी शांत तिरी,
आमराईच्या छायेतिल,
मिळेल का मला विसावा तरी,
आकाशातील गरुडाप्रमाणे,
घेतली मी झेप जरी,
आनंद मला मिळेल का,
त्या उंच गगनभरारी,
होडीच्या शिडाप्रमाणे,
मिळाली मला दिशा जरी,
विचारांच्या या प्रलयात,
तारेल का मला देव तरी.
