वर्षा
वाजत गाजत वर्षा आली,
मनाला माझ्या स्पर्षुन गेली,
झगमगाट तिने विजेचा केला,
उत्कर्षाचा इशारा दिला,
दाही दिशांना आनंद पसरला,
नव्या सुरवातीच्या स्वागताला,
पंख तिने नभी पसरले,
तुषारांचे आशीर्वाद दिले,
सभोवताली सुगंध दरवळला,
लहान- – थोरांना नाचवून गेला,
मन-मुराद वरुण बरसले.
आम्हा सर्वांना चिंब भिजवले.
उभे शहर न्हाउन निघाले,
आनंदाला बालकांच्या उधाण आले.
खळखळ खळखळ पाणी वाहीले,
नदी-नाले तुडूंब भरले,
सारे रान हिरवेगार झाले.
वृक्ष-वेलींचे पर्व आले,
मन सारयांचे निसर्गमय झाले,
आणी सारे देहभान विसरले.
नाचत नाचत वर्षा आली,
सृष्टीवर साऱ्या विराजमान झाली.
