माझा पंजाबी हरवलाय
अनपेक्षितपणे दोघेही पुन्हा समोरा समोर येतात, बरीच वर्ष उलटून गेलेली असली तरीही क्षणात दोघानाही कॉलेज कॅम्पस च्या रेस्टॉरंट मधील coffee टेबल, स्वतःच्याच जोक वर मोठ्याने हसणारा नवनीत आणि सगळे …सगळं काही आठवत.
आपण ऑफिस मध्ये आहोत हे विसरून दोघांच्याही तोंडून एकाच वेळी एक शब्द बाहेर येतो… कॉफी..
..
रीतू ने त्याची company join केलेली असते. एकमेकांचा विसर पडावा एवढं अंतर आणि एवढा काळ उलटून गेल्या नंतरही नियतीने दोघांना असं समोरासमोर आणलेल असतं… आणि पुन्हा ते निसटलेले क्षण शोधत दोघेही ग्राउंड फ्लोअर ला असलेल्या कॉफी शॉप च्या दिशेने हळूवार चालत असतात…
ती निशब्द तर
तो – ” काय गरज होती तुला इथे यायची, रिटायर झाल्या नंतर आली असतीस तरीही चाललं असत… प्रत्येकाच्याच नशिबात नसतं *** च package. भांडण झाल का तुझं बॉस सोबत ? ते तर होणारच होत, त्याशिवाय तुला केलेलं जेवण पचणार तरी कसं? …..तिथेच दुसरीकडे जॉईन केलं असतंस.. पगारा वरील एक शून्य कमी करून घेणं म्हणजे शहरातून खेडेगावात शिफ्ट होण्या सारखं आहे…”
ती – ” corona ने आयुष्यात प्रवेश केल्या नंतर याच खेडेगावात येऊन आपले प्राण वाचले. माझ्याही आयुष्यात असच काहीस झालं, स्वतःशी भांडून भांडून थकले होते मी, शेवटी जाणवलं नाव, पैसा, प्रसिद्धी यापेक्षा महत्त्वाचं आहे ते आपलं घर वाचवणं…”
तो – “मी तुला आधीच सांगितल असतं, नको करू त्या पंजाब्याशी लग्न, तू गेली कॅनडा कॅनडा करत त्याच्या मागे..😂😂”
ती – ” हो का…. तुझाच बेस्ट फ्रेंड होता ना तो.. आणि तसंही, एखाद्याच्या भावना आपल्यासाठी आटलेल्या असतील तर मन कुठेतरी आपलेपणा शोधतच असतं…”
तो – ” सगळेच तर माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत, पण काय करणार या शहाणी ला कोणीतरी दिडशहणा नको होता, तिची अरेरावी कोणी ऐकून घेतली असती 😜 ”
ती – ” हो ना, तेच तर हवं असतं कोणालाही, ऐकून घेणार कोणीतरी.”
तो – ” तुला माहित आहे first year ला आमचं भांडण झालं होत, दोघांना एकच टूल्स दिलं बनवायला…त्यावरून.. तेव्हा मला मित्रांनी सांगितल, नको त्याला जास्त बोलू, त्यांच्या जवळ किरपान (एक वक्र चाकू, शीख धर्मात काही जण जवळ ठेवतात) असतं, जास्त काही झालं तर…अग मी पण विचार केला नको , खरंच मारल त्याने रागात येऊन तर…घरी काय सांगणार…मलाच बोलतील… 😂
पण नंतर मात्र मैत्री सुद्धा झाली, तसा नवनीत सॉफ्ट स्पोकन आहे, फ्रेंडली आहे.. आणि नंतर आम्हाला अजूनही आश्चर्य वाटून हसायला येत की तेव्हा अस कसं झालं…
मग मीच त्याला म्हणतो…’ मेरी कोई गलती नहीं थी, बादमे घडी पे ध्यान गया तो पता चला .. अरे १२ बजे है , इसलिए मैंने छोड़ दिया तुम्हे, नही तो बहोत पीटे जाते…’ .😂. त्यालाही हसायला येत.. ”
ती – ” हो ना, खरंच मलाही विश्वास नाही बसला जेव्हा मी ऐकलं की दोघांचं भांडण झालं होत , कस शक्य आहे, नंतर कळलं.. हात न लावता चालू होत … एकमेकांना घाबरवण, नुसतीच तोंडाची वाफ निघत होती…😂😂😂”
तो – ” ए गप्प बस…तुझा विचार करून सोडलं त्याला… “
ती – ” हो का, मी दुसऱ्या क्लास मध्ये, ओळखी पण नव्हती हा माझी कोणाशी , मला सांगतोय..
पण कस रे, तुम्हा सर्वांचं निखळ झऱ्या सारखं खळखळाट करत राहणं आणि इतरांनाही त्यात सहभागी करून घेणं, मनाला भावून गेलं.. “
तो – ” पण झालं काय अचानक, आजकाल तो सुद्धा बोलत नाही जास्त…” (आपल्याला काही माहितीच नाही आणि नवनीत शी कधीच बोलणंच झालं नाही अस दाखवत..करणं त्याला हीची सुद्धा बाजू ऐकून घ्यायची होती..)
ती – ” आपण आपल्या संसारात खुश च असतो, सगळं काही ठीक असतं, पैसा, नाव, ओळख, वेळ, सगळं काही असतं. पण तरीही काहीतरी कमी जाणवते आयुष्यात.. ती म्हणजे नवऱ्याचा स्वभाव…”
( त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असत, पण म्हणतात ना प्रेमाने पोट नाही भरत, नाव, पैसा , विदेशात जाणं यांचं आकर्षण तर असतच, त्यामागे धावत दोघे गेलेही..
पण
संसार म्हटल की सर्व गोष्टी आल्या.. जबाबदारी, आई वडिलांना सांभाळणे… खूप काही…… त्याला घरची जबाबदारी नकोच होती कधी, त्याला फक्त चौकोनी कुटुंब हव होत…. उधळायला पैसा… उच्च राहणीमान….
मुख्य म्हणजे नंतर बायकोलाही वेळ देत नसे तो…
मित्रांबरोबर week end घालवणारा तो “तू कशी आहेस?, काही हवंय का ?” हे विचारायला सुद्धा त्याला वेळ नव्हता मिळाला कधी.
खर तर त्याने तसं विचारल्या नंतर तिच्या मनातील ज्वालामुखी फुटण्याची त्याला भीती वाटतं असेल, म्हणून त्याने तिला कधीच हा प्रश्न विचारला नाही. तिच्यासाठी त्याला वेळ च नसायचा.. एकाच छता खाली राहून हजारो मैला च अंतर त्या दोन मनांमध्ये वाढत चाललं होत. )
ती – ” एकीकडे बायको आणि घर या कडे न पाहणारा तर दुसरी कडे त्याचाच मित्र, बायको ला तिची ओळख, अस्तित्व निर्माण करून देणारा… अगदीच विरुद्ध ना.. ? नाती, पाहणारा, ज्याला पैसा आणि स्वार्थ कधी दिसलाच नाही.
त्याचाही स्वभाव असाच सगळ्यांना आपलंसं करून घेणारा, ज्यावर मी भाळले होते, आज अस वाटतंय की ते नव्हतंच कधी, स्वप्न होत का रे ते? माहिती आहे ना तुला, नवनीत सुद्धा असाच होता, कुठे हरवला रे तो..? chill करणारा happy go lucky माझा पंजाबी हरवलाय रे.😥.”
त्यावर काय बोलावं हेच त्याला कळेनास झालं…
( एव्हाना स्नॅक्स सोबत ३ री कॉफी चालू होती, lunch time झालेला, बॉस बरोबर आहे म्हणून कोणी कॉल सुद्धा केला नाही, जुनी मैत्रीण भेटली म्हणून इथे कामाचा विसर पडलेला.😜
भावना अनावर झाल्या म्हणून डोळ्यातील पाणी पुसत तिने गॉगल लावला, अर्थात कंपनी चा कॅफे म्हणून विनाकारण चर्चा व्हायला नको… पण ती नंतर झालीच,
काही coleague आले पण कॅफे मध्ये प्रवेश करण्यापूर्वी या angry young woman (boss) ला पाहून दुसऱ्या सेक्शन मध्ये गेले, काही जण परत गेले… )
तो एक सीप घेत तिला बोलला, …
” तुझ लव मेरेज आहे तो आधी तुझा मित्र होता, मग तुमच्यात प्रेम झाल आणि नंतर तो तुझा नवरा झाला.
काही परिस्थिती ने त्याचा स्वभाव बदललाय.. पण तु तर नाही ना बदललीस.. मग तु तुझ्या स्वभावाने त्याच्यातील मित्राला पुन्हा परत आण मग तुला कोणाचीही गरज नसेल…
आणि मित्रा सारखा नवरा हवा होता म्हणतेस ना, त्याच्यातील हरवलेला तुला हवा तसा मित्र तू त्याच्यात निर्माण कर, पूर्वी तो होता, मग आत्ता का नाही हा विचार कर, बहुतेक त्याची मैत्रीण तर हरवली नाही ना ?
माणस तीच असतात फक्त परिस्थिती त्यांना बदलते, समोरील व्यक्ती, विशेषतः नवरा कोणत्या परिस्थितीतून बाहेर जात आहे हे घरात राहून किंवा एका चौकटीत राहून नाही लक्षात येत..
स्त्रिया जॉब करत असल्या तरी त्यांची एक चौकट , सीमा त्यांनी सवतःला आखून दिलेली असते, बाहेरील जगाशी त्यांचा जास्त संबंध येत नाही..म्हणून नवऱ्याची मनस्थिती काय असेल हे बहुतेक स्त्रियांच्या लक्षात नाही येत..
आणि सगळेच नवरे बाहेरील त्यांचा ताण घरात नाही आणत, त्यांनाही क्षणभर विश्रांती घरात हवी असते..म्हणून तो शांत झाला असेल.. आणि मित्रांबरोबर week end घालवला तर मला नाही वाटत काही चूक करत आहे तो.
तुझ्यासाठी जमेची बाजू ही आहे की, तू म्हणाली म्हणून तो सुद्धा तीथल सगळं काही सोडून तुझ्यासाठी इथे आला, आपल्या समोर अनेक उदाहरण आहेत…. काही आपलेच मित्र मैत्रिणी त्यांच्या नवऱ्याला किंवा बायको ला इथे एकट ठेवून विदेशात आहेत.. कधीतरी येतात… तुझं नशीब चांगल आहे म्हणून तुम्ही दोघे सोबत काम करू शकलात..
शेवटी तू त्याच्यात प्रेम पहिलं की व्यवहार हे तुझं तुलाच माहित… आणि जिथे प्रेम आहे तिथे व्यवहार नाही होत.
पैसा मागे लागून स्वतःच्या आई वडिलांना सोडून विदेशात जाणारे आणि पुन्हा फिरूनही त्यांच्याकडे न पाहणारे काही मुल असतात पण त्याच्या या वागण्याला कुठेतरी तुझा विरोध होता अस कधीही नाही जाणवलं….
तरी तुम्ही विदेशात होते म्हणून नाहीतर इथे त्याच्या या वागण्यामागे तुलाच कारणीभूत ठरवल गेलं असतं.. कारण दुसऱ्याच्या घरातून आलेल्या मुलीवर आरोप लावणं सोप्प असतं आणि तिलाही ऐकून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो… विचार कर तो जर खरंच चुकीचा वागला असता तर तुझ्या बाजूने उभ राहणारी एखादी तरी व्यक्ती आहे का आज…
खरं तर तुला तो हाताबाहेर जाऊ नये किंवा गेला आहे अस वाटत होत म्हणून तू त्याला इथे यायला भाग पाडलं, पण तसं काहीही नव्हतं, नाही आहे आणि नसेल, तसं असतं तर तो सगळं काही सोडून परत आलाच नसता..
म्हणून हताश नाही व्हायच…….
शोधून बघ …तो तोच आहे, पण तू बदलली आहेस…त्याच्या साठी, तुझ्यातील त्याची मैत्रीण हरवली आणि त्याच्यातील तुझा मित्र हरवला…
थोडा वेळ लागेल पण नक्की सापडेल तो आणि स्वतःलाही सापडवशिलच तू… जशी आता या क्षणी माझी बॉस माझ्यासोबत नसून एक मैत्रीण बसलेली आहे.. अगदी तशीच… त्याच्या समोर जाताना तुझ्यातील त्याच्या बायको ला बाजूला ठेवून कधीतरी मैत्रीण होऊन जा त्याच्या समोर…….”
( त्याचं म्हणणं नवनीत ला तर पटलेलच होत, पण आज बहुतेक रीतू ला सुद्धा पटलेलं आहे.. )
त्या नंतर नवनीत आणि रीतू पुण्यात असताना बऱ्याच वेळा भेटले… वर्षभरात ते NCR ला शिफ्ट झाले…. आणि रीतू ला आवडणार एकत्र कुटुंब तयार झालं.
– Nitu
2014
( उपरोक्त कहानी में रितु नाम काल्पनिक है तथा लेखिका ने यहां रितू की मनःस्थिति को दर्शाने का प्रयास किया है। )
