मराठा कोण आहेत ?

महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
मराठा हा शब्द महारठीक शब्दापासुन तयार झाला आहे.
रठीक हे महाराष्ट्रातील पराक्रमी लोक होते .रठीकांना राष्ट्रीक असेही म्हणत होते. त्यावरून महाराष्ट्रीक असा उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रीकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र असे ओळखण्यात आले.
मराठा या शब्दाचे संस्कृत रूप महाराष्ट्र आहे, अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे.
भीष्म पर्व ” च्या ४४ व्या अध्याय अनुसार –
‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’
भावार्थ –
महारथ वगैरे शब्दही पूर्वी बोलले जायचे. या योद्धा लोकांच्या संज्ञा होत्या आणि त्या चार होत्या – अर्धरथ, रथ, महारथ आणि अतिरथ. जो एकाशी चांगले लढू शकला नाही त्याला अर्धरथ, जो एकाशी लढू शकतो त्याला रथ, जो दहा हजार योद्धे एकट्याने लढू शकतो त्याला महारथ आणि असंख्य लोकांशी लढू शकणाऱ्याला अतिरथ म्हणतात.
श्रीक्रुष्णाचे वंशज, यादव यांनी महराष्ट्रातिल देवगिरी ला भारताची राजधानी बनवली होती.
मराठा जाती महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले. जसे सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, देवगिरीचे यादव तर या सर्व राजवंशांचे वंशज आत्ताचे 96 कुळी मराठा आहेत.
नाणेघाटातील मराठी भाषेतील शिलालेख इ.स.२५० मध्ये गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राजाने मराठी भाषेत कोरून घेतला आहे .
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे मराठी भाषेत शिलालेख आहे तो इ.स.८५०चा आहे. ‘चामुंडराय करवियले .गंगराय सुत्ताले करवियले’असा तो शिलालेख आहे .हा बाहुबलीच्या मुर्तीखाली आहे.
ख्रिस्ती सनापूर्वी सातव्या शतकात क्षत्रिय दक्षिणेत आले. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील देशासंबंधाने पाणिनीच्याही पूर्वी कात्यायनाने आपल्या वार्तिकांत उल्लेख केला आहे.
* श्री वाल्मीकी रामायण – अयोध्याकांड, सर्ग ५१ लोक ६ यात दशरथाला महारथ विवर्धन असे म्हटले आहे.
* इ. स. पूर्व ६ व्या शतकात जैन लोकांच्या कृतांग सूत्र या भद्रवाहने लिहिलेल्या ग्रंथात महाराष्ट्र शब्द आढळतो, या ग्रंथाच्या आधाराने दुसऱ्या शामाचार्यांनी लिहिलेल्या श्री प्रज्ञापना उपांग सूत्र यात महाराष्ट्र शब्द आढळतो.
* पश्चिम घाटात काल्याजवळ भाजे नामक कोरीव लेणे आहे – तेथील पाण्याच्या हौदावर, ” महारथी साकोसिकी पुतसा । विष्णुदत्तसा देयाधमपोदी “ म्हणजे कौशिकपुत्र महारथी / महारठी / महारट्टी विष्णुदत्त याने हे बांधले असे लिहिले आहे.
या लेण्याचा काळ इ. स. पूर्व ३०० वर्षांचा आहे. मगध देशावर नंदाचे राज्य असताना, म्हणजे सुमारे २३०० वर्षांपूर्वी वररुची होऊन गेला. त्याच्या प्राकृत प्रकाश या ग्रंथात शेषं महाराष्ट्रीयत असा उल्लेख आहे, यावरून महाराष्ट्र व मराठा शब्दाचे प्राचीनत्व स्पष्ट होते.
( खरं तर जातं नसून एक समूह आहे असही म्हणता येईल, कालान्तराने एका समुहातिल चालिरिती, संस्कार एकसमान असल्याने त्यांचे वर्गीकरण होऊन जातीत रूपांतर झाले –
* ब्रह्म विद्या जाणतो तो ब्राह्मण, (इथे ब्रह्म विद्या म्हणजे ज्ञानार्जन आणि ज्ञानदान असा अर्थ आहे)
* क्षेत्र रक्षण करणारा क्षत्रिय,
* व्यापार करणारा वैश्य,
या प्रमाणे कर्म अनुसार् वर्गीकरण झाले…)
(बहुतेक हे वर्गीकरण, बौद्धीक, शरिरीक क्षमतेनुसार झाले असावे)
९६ कुळी म्हणजे काय आहे?
मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय जात आहे. मराठा जातीच्या 96 कुळी-मराठा, आणि अनेक पोटकुळ सुद्धा आहेत.
यावर सविस्तर माहिती आपण पुढील भागात पाहू….
Reference :
- केम्ब्रिज युनिव्हर्सिटी मे पाढाये जाने वाले
” The History of India 1600 – 1947 “
लेखक – Jordon Stewart. - भीष्म पर्व.
- भारतीय संस्कृती कोश.
- मराठी पुस्तक आम्ही चित्पावन.
