प्रवाह
प्रवाह होऊन वाहत रहा,
वाहतानाही तालामध्ये गुणगुणत रहा.
खडकावर् ठेच लागली जरी,
उत्सहाने खळखळत वहा
उपहासाने पाहणारयाच्या चेहरयावरही
आनंद तु फुलवत् रहा..
धबधबा होऊन कोसळलास तरी,
पुन्हा जीवन गीत गात वहा.
जिवनाच्या प्रवसाचा आनंद मात्र अविरतपणे घेत रहा….
