प्रतिध्वनी
बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येत काहीजण व्यवहार पाहतात, समोरील व्यक्ती कडून आपल्याला काय मिळतं आहे किंवा काय मिळतं नाही यावर त्या व्यक्ती कडे पाहिलं जात…नकळत इतरांना काय मिळत आहे आणि आपल्याला का नाही मिळत.. अशी तुलना करत व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होत जातो…..
खर तर आपल्याला नैसर्गिकपणे आपल्यातील प्रतिबिंब आयुष्यात पाहायला मिळत अस मला वाटतं,
काही लोक आपल्या प्रवृत्ती च्या विपरीत असतील तर सहसा आपण अशा लोकांशी एक तडजोड करत असतो आणि काहीतरी कारणाने ती मैत्री असो अथवा नात पुढे जाऊन अनोळखी असल्या सारखं होत… …
तर काही ठिकाणी निस्वार्थी भावनेने अनोळखी लोक सुद्धा जवळ येतात आणि तिथे दीर्घकाळ नकळतपणे ते नातं जपल जात…
खर तर आपल्या मनातील भावना कशा असतील तसे अनुभव आपल्याला येतात अस मला वाटत….
आनंदी लोक हे सतत आनंद वाटतं असताना दिसून येतात तर काही दुःखी लोक दुखा ची उजळणी करत आनंदाला दुरावताना दिसून येतात….
छान अनुभव असतील तर असे लोक सहज पणे आनंदी आणि इतरत्र मिसळणारे, सकारात्मक बोलणारे आणि आत्मविश्वासाने पुढे जातांना दिसून येतात…जे फक्त आनंद वाटतं असतात, चुकूनही कुणाला दुखावत नाहीत…
म्हणजेच मनातून निघणाऱ्या आवाजाचा प्रतिध्वनी आपल्याला आपल्या आयुष्यात सतत मिळतं असतो…
