” परवा “
किल्ल्यावर मी जाणार आहे परवा,
अनुभवणार आहे मोकळा श्वास अन् गारवा,
तो सूर्यास्त आणि ती सोनेरी कांती,
मिळेल तिथेच मला क्षणभर विश्रांती,
हरवलेल्या स्वतःस मी पुन्हा एकदा भेटणार,
लाटांवर आठवणींच्या स्वार मी होणार,
क्षितिजावर असेल त्या भेटीचे प्रतिबिंब,
तुषार अन् स्वरांनी भिजेल मी चिंब,
लाटांचे संगीत अन् माझे गीत,
सजेल नव्याने ही गीत – संगीत प्रीत…
P112.4
