” तेच क्षण त्याच किनाऱ्यावर “
चल जावू या आपण कुठेतरी दुर,
मग होईल का रुसवा तुझा दूर….
मला तर लावता ही येत नाही सुर,
म्हणशील तू मला भेसूर,
नको वाटू देऊ तुला आपण आहोत दूर,
आपण तर आहोत इथेच Mobile मध्ये एकमेकां समोर,
कशाला लावून घेतेस तुझ्या मनाला तू हुरहूर,
मिळेल वेळ तेव्हा ऐकत असतो मी तू गायलेला सुर,
थंडी कमी झाली आहे, थांबली असेल तुझ्या नाकाची फुरफुर,
त्या तिथे किनाऱ्यावर,
जिथून पाहत होतो आपण दूरवर,
होत होत्या लाटा खालीवर,
मावळत होता सूर्य क्षितिजावर,
पक्षी उडत होते आकाशी वर,
मावळतीची किरणं ही रंगत होती तुझ्याच सोनेरी कांतीवर,
चंद्र सुद्धा हळूच सामोरं येतं होता दूर आकाशी ढगांवर,
आकाश सुद्धा नहाले होते त्या लाल तांबूस संध्येवर,
मी किनारा, तू सागर,
शांत दिसत होतीस तू वरवर,
खळखळणं तुझं उसळत होत याच शांत किनाऱ्यावर,
सौंदर्य तुझं खुलत होत तुझ्याच गालांच्या लालीवर,
मी मात्र हरवत होतो तुझ्या हृदयाच्या सौंदर्यावर,
नकळत स्वतःस विसरलो होतो तुझ्या मंजुळ गीतावर,
चल जगू या का आपण पुन्हा तेच क्षण त्याच किनाऱ्यावर….
आपण दोघेच होतो, नव्हतं दुसरं कुणी तिथे दूरवर,
आठवत असेल तुला…हळूच हात ठेवला होता तू माझ्या हातावर,
आणि नजर होती आपली एकमेकांवर,
स्मित येत होत तेव्हा तुझ्या माझ्या चेहऱ्यावर,
मनही आपलं डोलत होत त्या गार वाऱ्यावर,
चोरत होती हळूच तू तुझी नजर,
पायांची बोट आपली भेटत होती पाण्यात हळुवार,
अंगावर उडत होते थंड ते तुषार,
केस उडत होते तुझे भुरभुर…
मनास लागली होती एक अनामिक हुरहुर,
जाणवत होत तुझ्या-माझ्या विचारांचं हळुवार काहूर,
जे माझ्या डोळ्यातून तुझ्या गालाच्या लालित उतरत होत हळुवार…
सांज तशी आली नाही पुन्हा आजवर,
चल निघू आताच जायला आपण कुठेतरी दूर,
चल जगू या आपण पुन्हा एकदा तेच क्षण त्याच किनाऱ्यावर….
