तुझ्या लेखणीतून

तुझ्यात वसते सरस्वती,
लेखणीतून तुझ्या प्रकटते तीच भारती…..

आभार तर मला मानायलाच हवे…
        सरस्वती ची अनेक रूप मला दिसतात, ज्यांच्या लेखणीतून अवतरलेली शब्द नकळतपणे वाचकांच्या मनावरच लिहिली जातात.

        अशीच एक लेखणी आहे,
सोनल ताई ची, ज्यातून कागदावर उतरलेले शब्द वाचताना नकळतपणे माझ्या मनावर ती लिहिली जातात आणि बरच काही माझ्या लेखणीतून….. एक हरवलेली, विस्मृतीत गेलेली वाट मला दिसते..

        काही लेख वाचून माझंच नव्हे तर इतर कोणाचेही मन आणि बुद्धी अंतर्बाह्य बदलते यात शंका नाही. 
        या प्रदूषित जगाच्या सहवासात, मन आणि बुद्धीवर निर्माण झालेला प्रदूषणाचा थर दूर करण्याचे काम ही लेखणी करत असते….
        त्यासाठी आभार मानावे तेवढे कमीच आहेत पण तरीही…निशब्द मी….

        लेखणी रुपी शारदेस वाचताना माझ्या नकळतच ती मला बरच काही जाणीव करून देत असते, तेच मी या मालिकेत व्यक्त करत आहे. माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे म्हणून इथे सुद्धा अपूर्णता जाणवत आहे मला व्यक्त होताना…
असो,
Once again…thanks  & Dedicated to….
त्या प्रत्येक लेखणीस जिच्या मुखातून सरस्वती बोलते…🙏     
                       05.02.2023