“तिखट पाणीपुरी !”
गाल माझे सफरचंद,
मन माझं स्ट्रॉबेरी,
स्वभाव माझा सॉफ्टी,
द्राक्षांचा मी गोडवा,
असे बीट रूट चा तजेला,
जणू कोकम, नीरे चा थंडावा,
बोली जशी स्पर्धा मधाला!
मी पेस्ट्री, मी सँडविच,
मी crispy fingure chips,
मी मॅगी सूप आणि मीच लॉलीपॉप,
प्रत्यक्षात जशी चॉकलेट डिप्स!
मीच आहे cold कॉफी,
डोळे माझे जसे चमचम तारे,
हास्य माझं गुलाबजाम गोड,
मीच जरा चटपटीत फारे!
जशी sweet कॉर्न सूप,
कधी बटरस्कॉच सारखी,
तर कधी रॅस्पबेरी लूप!
पावसात मी गरम कॉफी वाफाळलेली!
अन् श्रावणातली सृष्टी बहरलेली,
असे मी कोंकणी फणस,
सर्वांना हवीहवीशी अननस,
क्षणात होतसे कोल्हापुरी मिरची खरी,
क्षणात भासे तिखट पाणीपुरी!
