चंद्र हरवतो
फिरत फिरत चंद्र मोठा मोठा होतो,
बघत एक चांदणी तो गोल गोल फिरतो,
मधेच ढग काळा येता घाबरून तो बसतो,
मध्ये मध्ये पाहून तिला मनोमनी सुखवतो,
जाताच सारे ढग तिथून
तो बाहेर सावकाश निघतो,
चांदणी लगेंच त्याला बघून,
हळूच लपून बसते,
लपून छपून बघते दुरून,
ती हसते लाजून,
जाताच काळे ढग तिथून,
ती खुणावते डोळे मिचकावुन
होताच थोडी गुलाबी ती
प्रिय चन्द्र तिला हसतो,
अशी शुक्राची चान्दणी ती,
बघून तिला चन्द्र हा हरवतो….
