गजू आणि मी
” हे काय विमान आहे का पाहत उभ राहायला ?”
कॉलेज ला मि कधीही डबा नेत नसे, सकाळी 8 ला कॉलेज असल्याने लवकर डबा करण्या पेक्षा मी घरीच येईल असं आई ला सांगत होतो. वर्गातिल मुल्-मुली त्यांच्या डब्यात जेवणा चा आग्रह करत पण मि फक्त एक घास चविपुरत घेउन निघत असे, सुटी बहुतेक 1 तास होती आणि घर 2 किमी. बऱ्याच वेळा सोबत माझा कोणीतरी मित्र येतच होता आणि आम्ही जेवण करून 1.30 च्या आत कॉलेज मध्ये परत जातं होतो.
असंच एकदा गजानन ची मेस बंद होती, तो मला म्हणाला आज आपण बाहेर जेवायला जाऊ पण मी त्याला घरी घेऊन आलो.
रेंज हिल वरून घरी येत असताना बराच उतार होता आणि 1 तासात परत यायच होत म्हणून गाडी थोडी वेगातच चालवावी लागतं असे, तर त्या उतारवरुन् खाली येताना वेगात असताना च एक व्यक्ती धावत रोड क्रॉस करत होता आणि अचानक त्याच लक्ष आमच्या कडे गेलं आणि अंगावर वेगात गाडी येत आहे या भीती ने तो रस्त्यात च थांबला, बहुतेक त्याला सुचल नसेल कि आता काय कराव..
त्याने रोड क्रॉस करण्या पूर्वी पाहायला हवं होत किंवा त्याच वेगात् पुढे जायला हवं होत, पण आता त्याच्या नशिबाने त्याला रस्त्या च्या मधोमध आणून उभ केलं होत.
मला सुद्धा त्याला असं अचानक समोर प्रकट झालेल पाहून ब्रेक चा विसर पडला, हॉर्न च बटण पण वेळेवर सापडल नाही आणि मी आणि गजू चालू गाडीवर जोरात ओरडलो, पण त्या माणसापर्यन्त आमचा आवाज जाण्या पूर्वी तो हवेत उडाला आणि 10 ते 15 फूट समोर जाऊन पडला, नंतर त्याचा जवळ आमचा गाडी ला ब्रेक लागला, नशीब ब्रेक सापडला नाहीतर कल्पना न केलेली बरी. लोक जमा झाले. गाड्या एका बाजू ने जातं होत्या, आम्हाला वाटलं आता याला दवाखान्यात न्यावं लागेल, त्याला फ्रक्चर झालं असेल. पण तो माणूस उठून उभा राहिला, आणि आम्ही गाडीवरच होतो, गजू म्हणाला, ” त्याला मुका मार लागला, बर झालं काही जखम नाही झाली, थोडंसं खरचटलय ” लोक त्याला काही लागलं का ते पाहत होते पण तो आमचा जवळ येत होता.
तो काही बोलेल यापूर्वी मी त्याला म्हणालो, ” हे काय विमान आहे का असं रस्त्या च्या मध्ये पाहत उभ रहायला ? आणि हॉर्न देऊन पण बाजूला होत नाही, ….”, त्याला किंवा इतर कोणाला बोलायला चान्स न् देता आमच बोलण चालुच होत. त्याची चुक आहे असं समजून गर्दी थोडी कमी झाली, पण तो आणि काही लोक गाडी च्या बाजूला च् होते. तेवढ्यात दुसरी एक गाडी येऊन अमचा बाजुला थांबली आणि त्याने विचारलं, “काही लागलं तर नाही ना, जाऊ द्या….नेहमी गाडी चलवणारयाचीच चुक असतें असं नाही…” तर तो चिडलेला, पडलेला, वाचलेला माणूस त्याला बोलायला लागला कि तुम्ही मध्ये पडू नका…. प्रसंगावधान राखत लोकांनी जाण्यास जागा करून दिली आणि हळुच गाडी चालू करून पुन्हा जरा जास्त च वेग दिला. गजू ने मागे वळून पाहिलं तर ते दोघे अजूनही बोलत च होते आणि गर्दी सुद्धा तशी च होती आणि हळुच सगळ्यांच्या माना आमच्या कडे वळल्या होत्या…
शिवाजी महाराजांना आग्र्या वरून सुटका झाल्या नंतरही झाला नसेल तेवढा आनंद आम्हाला झाला होता….
( आता कॉलेज च् एक लेक्चर बुडाल होत आणि आम्ही जाताना दुसऱ्या मार्गाने गेलो होतो )
क्रमशः
