गंध
हि घाटातली वाट,
काय तिचा थाटमाट,
अशी फिरते मोकाट,
जसा राजस थाटात,
सांगते ही वाट,
गावचा हा घाट,
जसा कोकण चा थाट,
जणू स्वर्गाचा रंग
नाही त्याला थांग,
असे सागराचे अंग,
पडती पावसाच्या धारा,
येतो सुगंधी वारा,
देतो मनाला सहारा,
या स्वदेशी मातीत,
पाय चालले रुतत,
मन चालले गुंतत,
माझ्या मातीचा हा गंध,
त्यास अपूरा निबंध.
