५. ” एलीझाबेथ- गॉड कॉल्ड द क़्विन “
अखेर्…
“गॉड कॉल्ड द क़्विन”
(देवाने राणी ला बोलावून घेतले)
८ सप्टेंबर २०२२ ला ब्रिटेन ची महाराणी ‘एलिजाबेथ -२’ चे निधन झाल.
त्या ९६ वर्षाच्या होत्या, त्यांना ९६ तोफांची सलामी देण्यात आली.
महाराणी एलिझाबेथ -२ च्या निधना नंतर त्यांचा मुलगा, ‘प्रिंस चार्ल्स’ हे राजा झालेत. आता ते ‘किंग चार्ल्स – ३’ या नावाने ओळखले जातिल २४ तासां पेक्षा जास्त का सिंहासन रिक्त ठेवता येत नाही.

आता ब्रिटेन च्या राष्ट्रगितातिल शब्द –
‘गॉड सेव्ह द क्विन’ (देव राणी चे रक्षण करो)
च्या ऐवजी
‘गॉड सेव्ह द किंग’ (देव राजा चे रक्षण करो)
हे असतिल.
तसेच ‘ऑपरेशन युनिकॉर्न’ चालू करण्यात आल ज्या अंतर्गत राष्ट्रीय ध्वज अर्ध्या पर्यंत खाली आणण्यात आला, नोटा बदलण्यात येणार असून नविन राजा ‘प्रिन्स चार्ल्स-३’ यांचा फोटो नविन नोटांवर भागी नाण्यांवर असणार आहे. यापूर्वी राणी चा फोटो होता.
दरम्यान भारतात १ दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा घोषीत करण्यात आला. इतर ५५ देशांत सुद्धा राष्ट्रीय दुखवटा जाहिर करण्यात आला.
इंग्लंड आणी दक्षिण अफ्रीका यांच्यात होणारी क्रिकेट मैच रद्द करण्यात आली.
प्रिन्स चार्ल्स आता ब्रिटेन चे महाराजा झाले असून त्यांची पत्नी ‘कैमिला’ यांच्या कडे कोहिनूर असलेला मुकूट दिला जाईल.
महाराणी एलिझाबेथन या भारतात ३ वेळा आल्या होत्या.
1961, 1983, 1997.
त्या 1961 मध्ये गणतंत्र दिवसाच्या परेड मध्ये सहभागी,
ताजमहाल ला सुद्धा भेट दिली होती.
1983 मध्ये कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सहभागी होण्यासाठी ,
1997 मध्ये स्वतंत्रतेस 50 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल आल्या.

शाही परिवाराच्या उदयोगातून मिळवाया उत्पादना पैकी 800 कोटी क· वार्षीक खर्च शाही परिवारास दिला जातो.
नियमा नुसार शाही परिवारास त्यांची कोणतीही प्रॉपर्टी किंवा उद्योग विकता येत नाही.
‘किंग चार्ल्स – ३’ हे राजा झाल्या नंतर जनतेस दिलेल्या पहिल्या भाषणात ते भावूक झाले. त्यांची आई दिवंगत महाराणी एविझाबेथ त्यांची प्रेरणा होती. तिच्या प्रमाणेच जनतेशी एकनिष्ठ राहून जनतेची सेवा करण्याचे वचन त्यांनी जनतेला दिल.
महराणी एलीझाबेथ-२ ची काही क्षणचित्रे :-

एलीझाबेथ 1953 मध्ये राज्यारोहण प्रसंग
एलीझाबेथ – शहरात जाताना.


एलीझाबेथ 2022 , राज दरबार.
क्रमशः
