२. ” एलीझाबेथ – कुटुंब आणि साम्राज्य “

1953 साली एलिझाबेथ यांचा राज्यारोहण सोहळा झाला. एलिझाबेथ ब्रिटेन आणी ब्रिटेन च्या अधिपत्याखालील सर्व देशांची प्रमुख होती, तसेच ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती.
1981. जुलै मध्ये ‘प्रिन्स चार्ल्स’ आणि ‘डायना स्पेन्सर्स’ यांचा विवाह झाला, म्हटल जात प्रिन्सेस डायना ही
जगातिल सर्वात सुंदर स्त्री होती.


1996 मध्ये प्रिन्स चार्ल्स आणी डायना विभक्त झाले आणि त्यानंतर प्रिन्सेस डायना तिच्या कार अपघातात मृत्यू पावली. जो ऑक्सीडेंट घडवून आणला गेला होता असही म्हटल जात त्यामुळे राजघराण्याला कठिण टिकेला सामोर जाव लागल.
त्यावेळी महाराणी स्कॉटलैंड मध्ये आपल्या नातवंडांची काळजी घेत थांबली होती. प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांची काळजी घेण्याला राणी ने प्राधान्य दिल पण त्या काळात राणीला तिच्या जनतेपासून आपण दुरावल्याची भावना निर्माण झाली.
2011 मध्ये ‘प्रिन्स विल्यम’ आणी ‘कॅथरीन मिडलटन’ च्या
शाही लग्ना मुळे राज घराण्याला नव संजिवनी प्राप्त झाली.


जेम्स बाँड हा राणीचा सर्वात प्रिय आणि जवळ चा एजंट होता. (आपक जेम्स बॉण्ड वर निघालेले अनेक चित्रपट पाहीलेत.)
2018 साली दुसरा नातू ‘हॅरी’ याने अमेरीकन अभिनेत्री ‘मेगन मार्कल’ शी लग्न केल.
2019 मध्ये दुसरा मुलगा प्रिन्स ‘अँड्र्यू’ यांना राजघराण्यातिल जबाबदारी पासून पाय उतार व्हाव लागल कारण त्यांची मैत्री लैंगीक शोषणाचे आरोप असलेल्या एका व्यक्ती बरोबर आहे हे सिद्ध झाल होत.
2020 मध्ये ‘हैरी’ आणी ‘मेगन’ यांनी
शाही आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला
आणी ते कॅलीफोर्नीया मधे स्थायिक झाले.


2021 मध्ये राणी एलिझाबेथ यांचे पति प्रिन्स ‘फिलीप’ यांच्या निधनाने राणीला दुखातुन जावं लागलं होत. 78 वर्षांचा त्यांचा संसार झाला होता.
2022 साली त्यांच्या सत्ते ला 70 वर्षे पूर्ण झाली.
ब्रिटीश इतिहासात सर्वाधीक काळ सत्तेवर असलेली –
“राणी एलिझाबेथ.”


राणी एलिझाबेथ – २ एवढी लोकप्रिय बहुतेक दुसरी कोणतिही व्यक्ती होऊ शकणार नाही.
जगातिल 82 देशांमध्ये राणी एलिझाबेथ पासपोर्ट शिवाय जाउ शकत होती.
जगातिल 35 देशांतिल नोटावर राणी एलिझाबेथ ची मुद्रा छापली जाते.
जगातिल सगळ्यात जास्त जमिनीची ती मालकीण होती. जगभरात जवळपास 660 कोटी एकर जमीनीची ती मालकिण होती.
1953 साली एलिझाबेथ राणी झाली तेव्हा भारत स्वतंत्र झालेला होता, पण तरिही ती ब्रिटेन व्यतिरिक्त इतर 14 देशांची राणी होती.


(ब्रिटिश राष्ट्रकुल परिशदेतिल देश)
1. गुआ
2. बरबुडा
3. सेंट किटस
4. कैनेडा
5. पपुआ न्यू गिनी
6. ऑस्ट्रेलिया
7. न्युसीलैंड
8. बेसीन सेंट लुसीया,
9. बहामा
10. सेंटू विसेंट
11. ग्रेनेडा
|12. जुबाबू
13. ज़मैका
14. सोलोमन समूह
* महाराणी च्या अधिकारात खालिल कामांचा समावेश होतो..
1) सरकार नियुक्त करणे,
2) संसदेत भाषण देने
३) संसदेत बनवल्या जाणाऱ्या कायदयाला शाही स्विकृती देणे.
अशी ही लोकप्रिय आणी जगाच्या प्रगतिचे प्रेरणास्थान असलेली महान राणी 96 वर्षांची असतांना
8.सप्टेंबर.2022 ला काळाच्या पडदया आड गेली.
क्रमशः
