” एलिज़ाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर ”
चा जन्म 21. एप्रील 1926 रोजी झाला


ति फक्त 27 वर्षांची होती, जेव्हा तिने राज्यारोहणाची शपथ घेतली. 1200 वर्षांची सत्ता तिच्या हाती आली होती. तिला याची पूर्ण कल्पना होती की फक्त मृत्यूच तिच्याकडून ही सत्ता खेचून घेऊ शकतो.
त्यावेळच्या राजा चा दुसरा मुलगा- ‘द ड्यूक ऑफ योर्क’ ची ही दुसरी मुलगी. 1936 साली तिचे काका ‘८ वे किंग एड्वर्ड्’ यांनी जेव्हा पदत्याग केला तेव्हा एलिझाबेथ चे वडिल राजा झाले होते.


एलिझाबेथ तिच्या वडिलांशी एकनिष्ठ होती आणि ते तिचे प्रेरणास्थान होते.
दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जेव्हा जर्मनीन ब्रिटेन वर बाँब डागले तेव्हा हे राजघराण जुलुमशाही विरुद्ध लढत असलेल्या लढाईच प्रतिक बनल.


युरोप मधील आपला विजय साजरा करत असताना एलीझाबेथ बकिंगहॅम पॅलेस बाहेरील लोकाबरोबर तीच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाली आणि जगभरात लोकप्रियतेच्या शिखरा कडे किची वाटचाल चालू झाली.
जुलै 1947 मधे ‘लेफ्टनंट किलीप माउंट बॅटन’ यांच्या सोबात तिचा साखरपुडा जाहीर करण्यात आला,
नोव्हेंबर.1947 मध्ये ते विवाहबद्ध झाले.
ते एक ग्रिक राजपुत्र होते.


वर्षभरात एलिझाबेथ ला पहिला मुलगा झाला चार्ल्स आणी पुढिल 2 वर्षा नंतर दुसरी मुलगी ऍन चा जन्म झाला.
यावेळी ब्रिटेन चा राजा म्हणजे एलिझाबेथ चे वडिलांना कॅन्सर ने ग्रासले होते आणी त्यांचा निधन झाल होत.
त्यावेळी एलिझाबेथ केनिया मध्ये असतांना ती राणी झाल्या ची बातमी तिला मिळाली. राजाच्या जाण्या ने ब्रिटेन हळहळल पण या नवीन राणी चा त्यांनी सहजपणे स्विकार केला.

भारतावर राज्य करणारी राणी एलीझाबेथ -१ ली होती, त्या नंतर राणी विक्टोरिया ने भारतात साम्राज्य प्रस्थापित केलं .
राणी एलीझाबेथ -२ हि 1953 साली महाराणी झाली, आणि तिने ब्रिटेन च्या आधिपत्याखाली असलेल्या विकास असा केला कि तेथील लोकांचे मन जिंकून ती 14 देशाची राणी म्हणवली गेली.
पुढील काही भागात आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि राणी चे साम्राज्य आणि कुटुंब या बद्दल माहिती घेऊ.

क्रमशः
