आयुष्याच्या पुस्तकाचं पान
आयुष्याच्या पुस्तकाचं प्रत्येक पान वाचून, त्यावर नजर टाकणे वास्तवात आपल्या आत्मविकासासाठी महत्वाचं आहे. प्रत्येक पान आपल्या जीवनातील अनुभवांची आणि पुढील वाटचालीसाठी एक मार्गदर्शक मित्र, गुरुसमान आहे. प्रत्येक पान एक संघर्षाचं साक्षीदार असलं तरीही त्यातून भविष्यासाठी ची समज आणि ज्ञान हे नेहमीच मिळत असतं.
पुन्हा लिहण्याची शक्ती अंतर्मुखी विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे.
पानांचं रंग भरणे हे ह्याच्या विकासात एक नवीन परिप्रेक्ष्य आहे. पुस्तकाच्या पृष्ठांवर आपल्या संवेदना, विचारांच्या आणि कल्पनांच्या रंग भरणे हे आपल्या आत्मविकासाच्या साथी असते. असंख्य माणसांच्या अनुभवांमध्ये नेताना, प्रत्येक पान अनोळखी आणि नवीन मार्ग सादर करते.
अशी पाने कधीतरी वाचणे आपल्या जीवनात नवीन प्रेरणा, नवीन धैर्य, आणि नवीन सामर्थ्य येऊ शकतात. आपल्या आत्मविश्वासात वाढ देण्याचा एक महत्वाचा मार्ग असतो. तसेच, प्रत्येक पान आपल्या आत्मज्ञान वाढवण्याचा एक संदर्भ आहे ज्यामध्ये आपल्याला स्वतंत्रपणे, धैर्य, आणि समज विकसित करण्याची शक्ती मिळते.
अशा प्रकारे, प्रत्येक पान आपल्या जीवनात एक नवीन दृष्टिकोन निर्माण करण्याची एक संधी असतं..
म्हणूनच कितीही चुरागळलेली, कोरी, अपूर्ण असली तरी अमूल्य तत्व लपलेली ही पानं खूप मौल्यवान असतात…
आजच पान लिहिताना आजच्या पनाच महत्त्व जाणवतही नसेल पण, हेच वर्तमानातील पान भूतकाळात गेल्यानंतर मात्र हीच काळी, निळी अक्षरे सुवर्ण भासाल्याशिवय राहणार नाहीत..
🤔 पानं फाटलेली तर नाहीत.. पण बरीच पान काही न लिहिलेली, काही अर्धवट लिहिलेली, काही अगदीच rough page सारखी लिहिलेली आहेत…..
काही पानं पुन्हा वाचून अंतर्मुख होण्यासाठी, तर काही निराशेतही पुन्हा प्रेरित होण्यासाठी आहेत… इतर प्रेरित झालेही असतील, पण माझ्या तरी ती कधी पुन्हा वाचण्यातही आली नाहीत… एकदा लिहिलं गेलेलं पान पुन्हा लिहिता येत नाही पण.. सहजपणे पुन्हा वाचण्यात सुद्धा येत नाही,
नव्या सूर्योदया बरोबरच नवीन पान आपल्या समोर आणि लेखणी, रंग आपल्या हाती पुन्हा नवे चित्र रेखाटण्यास तत्पर असतात.. पूर्वानुभव गाठीशी असताना नक्कीच नवीन पान आणखी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न मात्र आपला चालूच असतो… असावा…
खरंच, आयुष्याचं प्रत्येक पान विचारपूर्वक खरंच लिहिलं गेलं का..?
हवे तसे रंग त्यात भरण्याच्या प्रयत्नात त्यातील चित्राचे काही रंग सुटल्या सारखं तर झालं नाही ना…?
13.04.2024
