” अमृतकुंभ “
अमृतमय सात्त्विक शुद्ध तू,
आरोग्यदायीनी धन्वंतरी तू,
अद्भुत, अवर्णनीय अन् अद्वितीय तू,
स्वर्णकमळात विराजमान अमृतकुंभ तू.
जीवन प्रवाहातील निरागस हास्य तू,
खळाळणाऱ्या सारिकेच मधुर संगीत तू,
पहाटे कीलबिलणाऱ्या पक्ष्यांचे मंजुळ स्वर तू,
अनंत दीपक प्रज्वलित करणारी दिवाळी तू,
सृष्टीतील निस्वार्थाची भावना तू,
आशेचा किरण दाखवणारी दृष्टी तू,
मायेचा करुण सागर, अनंताची देवी तू,
समर्पणाची कामना, सेवाव्रती ची साधना तू.
अहोरात्र होतसे तू रुग्णांची माता,
रूग्णालयात सर्वत्र तुझीच पुण्य गाथा,
हास्यात तुझ्या सदैव लाभे आरोग्याची आस्था,
तुझ्या स्पर्शाने मिळतो ऋग्णास माते चा सन्मान,
घेता दर्शन तुझे फुलतो नवशिशु चा ही अभिमान…
P72.4
