” अदृश्य नात “
प्रेम म्हणजे त्याग असतो,
समर्पण असत,
समोरच्या व्यक्ती ची काळजी असते,
तीच सुख आणि आनंद असतो,
तीच स्वप्नात रमण असत,
तिच आकाशात उडण असत,
तिचा पंखांना आपलं बळ असत,
सोबत नसतांनाही अदृश्य अशी ती साथ असते,
आठवणीत बेचैनी वाढवणारी ती आर्त असते,
प्रेम म्हणजे आणखी काय असत,
एकमेकांना समजणं असत,
दोन जिवांची ती निरपेक्ष मैत्री असते…..
कधी ती पती-पत्नी किंवा वस्तु, वनस्पती, प्राण्याशीअसते,
कल्पने पलिकडिल ते एक अद्रुश्य नातं असत…
26.01.2014
